रोहित पवारांवर का बनवले जात आहेत मीम्स, काय आहे ‘नवे पर्व’ प्रकरण? जाणून घ्या थोडक्यात

rohit pawar

पुणे – कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते कोविड सेंटर मध्ये जाऊन डान्स करतात तर कधी ते सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जेवण करतात. कधी ते लोकलने प्रवास केल्यामुळे चर्चेत असतात तर कधी पार्थ पवार विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष सुरु असल्याच्या चर्चांमुळे ते चर्चेत असतात.

सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असणाऱ्या रोहित पवार यांना सध्या ट्रोल केले जाऊ लागले आहे. नुकतेच ते एका सलूनच्या दुकानात गेले होते तेथे सलूनमध्ये ट्रिमिंग करुन घेतलं मात्र या छोट्याश्या कृतीचे फोटोज पवार आणि त्यांच्या समर्थकांनी फार मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले. यामुळेच रोहित पवार यांचे हे वागणे दिखाऊपणा असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

रोहित पवार

रोहित पवार यांच्या बारामती एग्रो या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायातील व्यावसायिकांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. बारामती अॅग्रोचे फीड खाऊ घातल्याने कोंबड्यानी अंडी देणे बंद केल्याचा आरोप होऊ लागला आहे.यामुळे पुरंदरसह अनेक ठिकाणच्या पोल्ट्री व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. मात्र पवार हे कोणत्याही प्रकारे याची दखल घेत नसल्याचे शेतकरी आक्रोश करून सांगत आहेत. यातूनच अनेकांना रोहित पवार यांच्या कथनी आणि करणी यात फरक दिसू लागला आहे.

या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून आता त्यांना ट्रोल केले जात आहे. काहींनी त्यांना ‘भावी पंतप्रधान’ तसेच ‘नवे पर्व’ या शब्दावरून कोट्या करून कमेंट्स केल्या आहेत तर काहींनी त्यांच्यावर मिम्स सुद्धा बनवले असून या माध्यमातून देखील पवार यांना ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, कृषी कायद्यांवरून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनांमुळे देश ढवळून निघाला आहे आणि देशाचं राजकारणही तापलं आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कडाडून विरोध केला आहे. कृषी कायद्यात तरतूद असलेल्या करार शेती पद्धतीला शरद पवारांसह त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र बारामती येथे रोहित पवार आयोजित कृषिक या कृषी नाविन्यपूर्ण प्रदर्शनात रोहित पवार प्रमुख असलेल्या बारामती एग्रोने चक्क करार शेतीचे भरमसाट फायदे सांगितले होते. विशेष म्हणजे हे फायदे सांगणारे फ्लेक्स देखील मोठ्या थाटात लावले असल्याचे देखील दिसून आले होते.

महत्वाच्या बातम्या 

IMP