fbpx

कोजागिरी स्पेशल – का साजरी करतात कोजागिरी ?

why kojagiri celebrate in india

खगोलशास्त्रदृष्ट्या महत्व

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते.आश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरभ्र होते.अशावेळी इष्ट मित्रांसह चांदण्या रात्रीची मौज अनुभवता यावी ,म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा.[३]

विविध राज्यात अशी साजरी करतात कोजागिरी
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.राजस्थानातल्या स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात.धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून ब्राह्मणांना शर्करायुक्त दूध देतात.हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.