जो न्याय मराठा समाजाला देता तो धनगरांना का नाही? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक

Uddhav Thakrey, dhangar and maratha arakshan

मुंबई : राज्यात सद्या आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा अरक्षणास स्थगिती दिल्यामुळं राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्यास नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. यातच आता महाविकास आघाडी सरकारच्या डोके दुखीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून एसटीचे दाखले तात्काळ द्यावेत. जे आदीवासी समाजाला तेच धनगर समाजाला मिळावे अन्यथा राज्य सरकार विरुध्द धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे असा स्पष्ट इशारा धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. याआधी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

त्यावेळी त्यांनी “धनगर आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडू” असा इशारा दिला होता. “ओबीसींची भूमिका ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आहे, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे. आमचा विरोध केवळ मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणात एकत्र करण्याला आहे.” अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

“धनगर समाज देखील रस्त्यांवर उतरून आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. पण त्यांचं म्हणणं सरकारकडे पोहोचत नाही. त्यामुळे आरक्षणासाठी येत्या २८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यात सामुहिक आंदोलन करणार असल्याचा” इशारा प्रकाश शेंडगेंनी दिला आहे. “मागच्या सरकारने निधीची घोषणा केली मात्र एक छदाम देखील दिला नाही.तर, जो न्याय मराठा समाजाला देता तो धनगर समाजाला का नाही?” असा सवाल देखील त्यांनी विचारला असून बैठकीची मागणी केली आहे. तसंच, याची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करू त्याची जबाबदारी सरकारची असेल असं प्रकाश शेंडगे म्हणाल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :