पंतप्रधान मोदी लखीमपूर हिंसाचारावर बोलत का नाही?, सीतारमन यांनी दिले उत्तर; म्हणाल्या…

nirmla sitaraman

नवी-दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वत्र पडसाद उमटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी एकही शब्द न बोलल्यामुळे विरोधकांकडून टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून शेतकऱ्यांची हत्या होण निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागातही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

सीतारमन ह्या सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये संवाद साधतांना त्यांनी घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत असं सांगताना फक्त तिथे भाजपाचं सरकार आहे म्हणून जेव्हा योग्य वाटेल तेव्हा नाही असे सांगत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेत्यांकडून लखीमपूर हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? असे विचारण्यात आले असता यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की,’नाही…नक्कीच नाही. बरं झालं तुम्ही अशा एका घटनेचा उल्लेख केलात जी निषेधार्ह आहे. आमच्यातील प्रत्येकाचं हेच मत आहे. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असून तो माझ्या काळजीचा विषय आहे.’

दरम्यान, पुढे बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’मी माझा पक्ष किंवा पंतप्रधानांचा बचाव करत आहे यातला भाग नाही. हा देशाचा बचाव आहे. मी देशासाठी बोलत आहे. मी गरीबांना न्याय देण्यासाठी बोलणार. माझी थट्टा होऊ देणार नाही, आणि जर ते थट्टा करत असतील तर मी उभे राहून ‘सॉरी, चला तथ्यांवर बोलू’ असे म्हणणे बचावात्मक असेल. तुमच्यासाठी हेच माझे उत्तर आहे.’

महत्वाच्या बातम्या