मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी (आज) अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाची प्रदर्शित होण्यापूर्वीच संपूर्ण जगात चर्चा होऊ लागली आहे. कारण गणितज्ञ शकुंतला देवी यांना ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. यामुळे संपूर्ण जगातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दिवंगत शकुंतला देवी यांनी १८ जून १९८० रोजी ब्रिटनमधील इंपीरियल महाविद्यालयात २८ सेकंदात कुठल्याही १३ अंकी आकड्यांचे गुणाकार करुन दाखवले होते. शिवाय काही सेकंदात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा विविध पद्धतीने त्यांनी आकडेमोड केली होती. या विक्रमासाठी त्यांना ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने गौरवण्यात आलं आहे. त्यांची मुलगी अनुपमा बनर्जी यांच्याकडे हा पुरस्कार सोपवण्यात आला.
‘शकुंतला देवी’ हा चित्रपट ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना शकुंतलादेवी वयाच्या तिसऱ्या वर्षीच कोणतीही आकडेमोड झटक्यात आणि बिनचूक करू शकायच्या. गणिताचे जाहीर कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी जगभर दौरे केले होते. गणिताचं त्यांचं कौशल्य पाहून भलेभले अचंबित होत. त्यांनी गणितावर, ज्याोतिषशास्त्रावर पुस्तकं लिहिली. समलैंगिकतेविषयीचं भारतामधलं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. २०१३ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ झाला लीक
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले डब्लूएचओ…
नंदुरबार : संकटकाळातील शैक्षणिक प्रगतीबद्दल निती आयोगातर्फे जिल्ह्याचे कौतुक