fbpx

मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंवर का आहेत नाराज?

टीम महाराष्ट्र देशा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सत्तात्याने भाजप पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. त्यातच आता मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मते देण्यास सांगितले आहे. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. हे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशामुळे मनसेच्या कट्टर कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला आहे की, ज्यांना कधी मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम कसे काय करायचे. त्यामुळे मनसेचे सर्व सामान्य कार्यकर्ते आणि मतदार राज ठाकरे यांच्या या निर्णयावर नाराज आहेत.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आघाडीच्या उमेदवारांना मते देण्यास सांगितले आहे. इतक नव्हे तर आघाडीचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रचार आदेश राज यांनी दिले आहेत. अशा प्रचारचा आदेशच राज यांनी समर्थक, कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पण राज यांचा निर्णय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवडला नाही.

दरम्यान, मुंबईतील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या मते, ते मुळचे शिवसैनिक आहेत. आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा धनुष्यबाण किंवा कमळासमोरील बटण दाबत होतो. त्यानंतर जेव्हा मनसेत आलो तेव्हा इंजिनला मत दिले. पण आतापर्यंत कधीच काँग्रेस वा राष्ट्रवादीला मत दिले नाही.