‘क्यूएस’ या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत पुणे विद्यापिठाच नाव का नाही ?

uni pune

पुणे : देशातील दहावे आणि राज्यातील पहिले असलेल्या पुणे विद्यापीठला ‘क्यूएस’ या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत स्थानच नाही. या संस्थेकडून नुकतीच विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना मिळालेल्या रोजगारानुसार ‘रोजगारक्षम विद्यापीठांची’ जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात आली.

या संदर्भात प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम म्हणाले, क्यूएस’ आणि टी एस सी अश्या दोन आंतरराष्ट्रीय संस्था रोजगारक्षम विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करत असतात. यामध्ये  पुणे विद्यापीठाने फक्त टी एस सी संस्थेला माहिती दिली असल्यामुळे क्यूएस’ या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विद्यापीठाचे नाव नाही.