मुंबई : रामदेव बाबांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मोठा झटका दिला आहे. आयएमएने पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळला आहे.
हे औषध एवढ्या घाईने बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणे योग्य नसल्याचे सांगतानाच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केल्यामुळे रामदेव बाबांची चांगलीच कोंडी झाली आहे.
#WHO, #IMA व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या #Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.
(२/२)— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 23, 2021
दरम्यान,नियमानुसार बाबांच्या या औषधावर बंदी घातली असेल तर याचे स्वागत करावेच लागले मात्र महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी आहे,गुटख्यावर बंदी आहे अनेक अमली पदार्थांवर सुद्धा बंदी असूनही याची सर्रासपणे विक्री होताना दिसते याबाबत गृहमंत्री म्हणून काय भूमिका आहे देशमुखांची हे समजले तर अधिक उत्तम होईल. कारण महाराष्ट्रातील हजारो तरुण आज या विषारी व्यसनाच्या विळख्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे.
व्यसनाधीन तरुणांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची नव्हे का ? गृहमंत्री म्हणून देशमुखांची नव्हे का ? जेवढी तत्परता बाबांच्या या औषधावर बंदी घालण्यासाठी केली तेवढी तत्परता गुटख्याच्या विक्री करत असलेल्यांवर कारवाई करण्यसाठी का दाखवली जात नाही हा सवाल आज उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालकासह दुचाकीस्वाराला उडवले; औरंगाबादेत रात्री भीषण अपघात
- मराठवाड्यात ६०५, औरंगाबादेत सर्वाधिक २४० रुग्णांची भर; १९७ कोरोनामुक्त, चौघांचा मृत्यू
- कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; जालन्यात ११७ नव्या रुग्णांची भर
- मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी
- रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न