fbpx

बायको हॉस्पिटलमध्ये वेदनेने विव्हळत होती, आणि त्यांनी गुजरात पेटवला

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस आणि पाटीदार समाज आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना भरसभेत कानशिलात लगावण्यात आल्याचा प्रकार सकाळी घडला होता, हार्दिक भाषण करत असताना अचानक झालेल्या प्रकाराने एकच गोंधळ उडाला होता. आपल्यावर हल्ला करणारी व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला होता. मात्र, आता संबंधित व्यक्तीने सर्व आपबीती सांगितल्यावर सत्य बाहेर आले आहे.

हार्दिक पटेल यांना कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘तरुण गज्जर’ असून तो महेसाणा जिल्ह्यातीलं आहे, पाटीदार समाज आरक्षणाच्या मागणीवर रस्त्यावर उतरला असताना तरुण गज्जरची पत्नी गरोदर होती, तिला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. मात्र बाहेर चाललेल्या पाटीदार आंदोलनामुळे तरुणाला मोठ्या त्रासाला समोर जाव लागलं, यावेळी त्याने हार्दिकच्या कानशिलात लगावण्याचे पक्के केले होते, असा जबाब पोलिसांना दिला आहे.

जन्मलेल्या मुलासाठी औषधे आणण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी पुन्हा एकदा हार्दिक पटेलने अहमदाबादमध्ये रॅली काढत सर्व शहर बंद पाडले होते, हार्दिक त्याला जेंव्हा हवं तेंव्हा गुजरात बंद पाडत होता. त्यामुळे आपल्याला आणखीनचं राग आल्याचं तरुण गज्जरने सांगितले आहे.