मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांची मुलगी अंकिता पाटील (Ankita Patil) आणि निहार ठाकरे (Nihar Thackrey) यांचा २८ डिसेंबरला विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील अनेक जणांना लागण होण्याची शक्यता आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तुम्ही मास्क का वापरत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर संजय राऊत यांनी मी मोदींना फॉलो करतो, असे उत्तर दिले आहे.
अंकिता आणि निहार ठाकरेंच्या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात हजेरी लावलेले नेते एकापाठोपाठ एक करोना पॉझिटीव्ह येत आहेत, त्यामुळे येत्या काळात आणखी काही लोक बाधित होण्याची शक्यता आहे.
खासदार संजय राऊत नाशिक येथे आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. राऊत म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्याला सांगतात, मास्क लावा. मात्र ते स्वत: मास्क लावत नाहीत. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) मास्क लावतात. मात्र सर्वोच्च नेते प्रधानमंत्री तेच मास्क लावत नाहीत. आम्ही त्यांना फॉलो करतो. त्यांनी आधी मास्क लावावा. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं, असेही राऊत यावेळी म्हणाले.
देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असताना सर्व राज्यांना तयारी करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी मास्क लावत नाही म्हणून आम्ही देखील मास्क लावत नाही असे विधान करून मोदींना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती’
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<