कोटींची पारितोषकं देणारे राजकारणी यावर्षी ‘ती’ रक्कम गोविंदा मंडळांना का वाटत नाहीत?

Kedar Shinde

मुंबई : गेले ४ महिने कोरोना महामारीच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन अजून देखील संपलेला नाही. तर, या संसर्गाची वाढती रुग्णसंख्या बघता येणारे सर्व सण, उत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्वच स्थरातून करण्यात येत आहे. त्यामुळेच यंदा दहीहंडी गोविंदांच्या थरांविनाच अशी परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे.

याच, पार्श्वभूमीवर आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक ट्विट करत या गोविंदा पथकांतील हजारो गोविंदांच्या आर्थिक विवंचनेला वाचा फोडली आहे. केदार शिंदे यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी जी कोटींची पारितोषकं राजकारणी मंडळी बक्षीस म्हणून हंडी फोडणाऱ्या पथकांना दरवर्षी देत असतात तसेच हे पैसे यंदा ते या पथकांमध्ये का वाटत नाहीत? असा सवाल देखील उपस्थित करत हे काम करण्याचं  देखील केलं आहे.

Alert: पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरु!

केदार शिंदे यांनी, ‘ यावर्षी दहीहंडी नाही. कुठलेच सण मोठ्या प्रमाणात साजरे करता येत नाहीएत. पण कोटी कोटीची पारीतोषिकं दरवर्षी जाहीर करणारे राजकारणी brands, या वर्षी ती रक्कम गोविंदा मंडळात का वाटत नाहीत? या वर्षी त्यांनी या “थराला” जाऊन काम करावंच! ‘ असे ट्विट केले आहे.

‘उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या मुलाने राजीनामा द्यावा’

अनेक गोविंदा उत्सव मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, अनेक गोविंदा पथके हे मुंबईतील अनेक मानाच्या हंड्या फोडतात तर काही पुणे व अन्य शहरात देखील जातात. लाखोंचे मिळणारे बक्षीसं यातून अनेक गोविंदांना आर्थिक सहाय्य करत असते. मात्र, यावर्षी दहीहंडीच नसल्याने आर्थिक विवंचना सोडवण्याचा मोठा प्रश्न या गोविंदा पथकांतील हजारो गोविंदांना पडला आहे.

भाजपा खासदार-आमदारामध्येच एकमत नाही; पडळकरांनी केली संजय पाटलांवरच टीका