अभिनेत्री समीरा ‘पांढरे केस’ का लपवत नाही; पोस्टद्वारे केला खुलासा

samira

मुंबई : मुसाफिर टैक्सी नंबर ९२११ आणि रेस सारख्या हिट चित्रपटात झळकलेली अभिनेत्री समीरा रेड्डी बॉलीवूडपासून दुरावली असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. समीरा आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

समीरा बॉडी पॉझिटिव्हिटी तसेच एज शेमिंग सारख्या मुद्दयांवर बिनधास्तपणे बोलत असते. नुकताच तिने नेव्ही ब्ल्यू टी-शर्ट घातलेला एक फोटो शेअर केलाय. या फोटोत समीराचे पांढरे केस लक्ष वेधत आहे. फोटो शेअर करत समीराने तिच्या वडिलांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर पोस्टद्वारे दिले आहे. समीरा म्हणाली माझ्या वडिलांनी मी पांढरे केस का लपवत नाही असा प्रश्न मला विचारला. ते माझ्या पांढऱ्या केसांमुळे चिंतेत आहेत.’

वडिलांची चिंता दूर करत समीराने त्यांना उत्तर दिलंय. ती म्हणाली ‘ काय फरक पडतो. यामुळे मला वयस्क किंवा कमी आकर्षक किंवा कमी सुंदर समजलं जाईल का?, माझा एकही पांढरा केस दिसू नये म्हणून मी दर दोन आठवडयांनी माझे केस कलर करायचे. आज केस रंगवायचे की नाही याचा निर्णय मी स्वत: घेते. मला माहितेय मी एकटी नाही. जेव्हा जुन्या विचारांच्या पध्दतीती मोडल्या जातात तेव्हांच बदल घडतो. आपण जस आहोत तसेच राहू दिलं तर हे बदल घडणं शक्य आहेत. अभिनेत्री समीरा रेड्डीने २०१४ साली उद्योगपती अक्षय वर्देसोबत विवाह केला. तिला आता हंस आणि नायरा ही दोन मुलं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या