जर्मनीची औरंगाबादला पसंती का? जाणून घ्या कारण…

BIBI KA MAKBARA

औरंगाबाद – इंगोल्स्टँड हे एक ऐतिहासिक शहर आहे. ज्यात वारसा आणि सांस्कृतिक मूल्ये आहेत. तेथील बव्हेरियन युनिव्हर्सिटीची चांगली ओळख आहे. जेथे  अनेक प्रमाणात भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. जगभरातील सुमारे दहा शहरासोबत त्यांनी भागीदारी केली आहे. दोन्ही शहरे संस्कृती आणि वारसाने समृद्ध असल्याने त्यांनी औरंगाबाद निवडले आहे.

इंगोल्स्टँडने स्वत:ची जर्मन कार ऑडीच्या निर्मितीसाठी २००७ मध्ये औरंगाबादला पसंती दिली होती. त्यानुसार ऑडीच्या काही पार्ट औरंगाबादेतून तयार होतात. या भागीदारीप्रमाणेच १९६८ मध्ये मुंबई-स्टटगार्ट यांच्यामध्ये भारीदारी झाली होती. या भागीदारीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये देवाणघेवाण झाली होती, असे भारतीय वाणिज्य दुतावास डॉ. सुयश चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबाद शहर आणि जर्मन शहर इंगोल्स्टँड यांच्या मधे आगामी काळात शिक्षण, उच्च शिक्षण, उद्योग, व्यापार, पर्यावरण, ट्रेड, पर्यटन वाढीसाठी सामंजस्य करार होणार आहे. दोन्ही शहराच्या शिष्ठमंडळांची व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी चर्चा संपन्न झाली. यास दोन्ही शहरातील शिष्ठमंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आगामी काळात जर्मनीसोबत औरंगाबादचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

नांदेड येथील मुळचे रहिवाशी असलेले भारतीय वाणिज्य दुतावास डॉ. सुयश चव्हाण यांनी या कॉन्फरन्ससाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी इंगोल्स्डॅट शहराचे भौगोलिक, विविध देशांतील प्रदेश आणि शहरे यांच्यामाध्यमातून औरंगाबाद व इंगोल्स्टँड एकत्र कसे येऊ शकेल, सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही शहरांना कसा फायदा होऊ शकेल यासंदर्भात तपशीलवार सादरीकरण केले.

महत्वाच्या बातम्या