बंदर क्या जाने अद्रक का स्वाद…पंतच्या सनग्लासेसवरून थट्टा करणाऱ्या समालोचकांवरच मिम्सचा पाऊस  

पंत

ऑस्ट्रेलिया : बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला 15 जानेवारी  पासून सुरुवात झाली असून. ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात हा सामना खेळवला जात आहे.  या सामन्याचे समालोचन करताना वॉर्न यांनी सहकारी केरी ओकिफी यांच्यासोबत मिळून रिषभ पंतची थट्टा केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यांनाच सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सामन्यादरम्यान झाले असे कि, रिषभ पंत  याने अजब सनग्लासेस घातले होते. त्याच्या सनग्लासेसचा रंग पोपटी आणि लाल असा होता. सोबतच त्यांची डिझाईन लहान मुलांच्या सनग्लासेसप्रमाणे असल्याचे दिसत होते.

हे पाहून सामन्याचे समालोचन करत असलेल्या वॉर्न यांनी ऑकिफी यांना विचारले की, “पंतच्या सनग्लासेसवरील रंगांचे शेड्स पाहून तुला काय वाटतं?. मला तर तो सरळ सर्व्हिस स्टेशनमधून इथे आल्यासारखे वाटत आहे.” “मला तर त्याच्या सनग्लासेसला ओरखडावे असे वाटत आहे. जेणेकरून आपण त्यांना कचरापेटीत तरी टाकू शकतो”, असे वॉर्नच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देत ओकिफी म्हणाले.

वॉर्न आणि ओफिकी यांच्यातील या संवादावर भारतीय क्रिकेट रसिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका रसिकाने वॉर्न यांचे क्रिकेट सामन्यादरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे सनग्लासेस घातल्याचे फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘मला नाही वाटतं की, हे पाहिल्यानंतर वॉर्न दुसऱ्यावर कमेंट करु शकतात. तसेच काही क्रिकेट रसिकांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बंदर क्या जाने अद्रक का स्वाद’, असे एका वापरकर्त्याने लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या