Share

कुणाला कमी तर कुणाला जास्त का वाजते थंडी? जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: सप्टेंबर महिना Winter सुरू होताच सर्वत्र हलकी थंडी जाणवायला लागली आहे. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी थंडीची चाहूल लागत आहे. या वाढत्या थंडीमध्ये काही लोक अजूनही टी-शर्ट आणि शॉट घालून फिरताना दिसत आहे. तर त्याच्याविरुद्ध काही लोक पूर्ण पॅक होऊन म्हणजेच स्वेटर आणि कान टोपी घालून फिरताना दिसतात. काही लोकांवर थंडीचा काहीच परिणाम होत नाही तर काही लोक थंडीने कडकडून जातात. हे असे का होते? त्याबद्दलच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

सर्वात पहिले आपल्या त्वचेला थंडीची जाणीव होते. काही वेळा या थंडीमुळे आपल्या अंगाला काटे (Goosebumps) येऊन आपली बोटे सुन्न होऊ लागतात. शरीरातील तापमानात घट झाल्यामुळे आपल्याला थंडी जाणवायला लागते. आपल्या शरीरात त्वचेखाली असलेल्या थर्मो-रिसेप्टर नर्व्स (Thermo-receptors Nerves) मज्जातंतू लहरीच्या रूपात मेंदूपर्यंत थंडीला पोहोचवतात. याची तीव्रता आणि पातळी लोकांप्रमाणे बदलू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने थंडी जाणवते.

हायपोथर्मियामुळे थंडी जाणवायला लागते

थंडीचा सर्वप्रथम त्वचेवर परिणाम होऊन त्वचेला थंडी जाणवायला लागते. शरीरातील तापमान कमी झाल्यामुळे आपल्या शरीराला थंडी जाणाऱ्या लागते. थर्मो-रिसेप्टर नर्व्स (Thermo-receptors Nerves) माध्यमातून मेंदूला थंडी जाणवायचा संदेश पाठवला जातो. यानंतर मेंदू शरीराच्या सर्व अंतर्गत व बाह्य अवयवांना तापमान टिकवून ठेवण्यासाठी सांगतो. त्यानंतर आपल्या शरीराच्या स्नायूंचा कामाचा वेग कमी होऊ लागतो. तज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या मते, शरीरातील तापमान कमी झाल्यास शरीरातील अनेक अवयव काम करणे बंद पडतात. शरीराला खूप थंडी जाणवणे याला हायपोथर्मिया असे म्हणतात.

खूप गार का जाणवते ?

  • आपल्या उंचीनुसार आपले वजन पाहिजे असे सल्ला नेहमी डॉक्टर आपल्याला देतात. त्यामुळे तुमच्या उंचीच्या प्रमाणात तुमचे वजन कमी असेल तर तुमच्या शरीरात थंडीचे प्रमाण जास्त असू शकते.
  • जर तुमच्या शरीरात आयरन कमतरता असेल तर तुम्हाला तीव्र थंडी जाणवू शकते. कारण शरीरातील आयरनची कमी हाडे कमकुवत करतात त्यामुळे शरीराला थंडी जास्त जाणवते.
  • रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे शरीराच्या सर्व भागांना मुबलक प्रमाणात रक्त पोहोचत नाही. त्यामुळे देखील तुम्हाला जास्त थंडीचा सामना करावा लागू शकतो.
  • व्यवस्थित झोप न लागणे हे देखील थंडी जाणवायचे एक कारण असू शकते. त्याचबरोबर शरीराला मुबलक प्रमाणात झोप न दिल्यास थंडी जास्त जाणवू शकते.
  • तुम्ही जर डीहायड्रेशनचे रुग्ण असाल तर तुमच्या शरीराला देखील थंडी जास्त जाणू शकते. त्यामुळे नेहमी शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करत मुबलक प्रमाणात पाणी पिले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सप्टेंबर महिना Winter सुरू होताच सर्वत्र हलकी थंडी जाणवायला लागली आहे. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी थंडीची चाहूल …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now