‘मुख्यमंत्र्यांना भेटण्यापेक्षा लोक राज्यपालांकडे का जातात? याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावं’

मुंबई: मुख्यमंत्र्यांना भेटण्यापेक्षा लोक राज्यपालांकडे का जातात याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी आणि त्यांच्या पक्षाने करावे आणि मग बोलावं , अशी प्रतिक्रिया विधान परिषद् विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

सरकारकडून काही होत नाही त्यामुळे घटनात्मक पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या राज्यपालांकडे जनता न्याय मागण्यासाठी जाऊ शकते. पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत त्यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. शिवसेना मूळ प्रश्नांवर बगल देण्यासाठी रोज असे नवीन फंडे आणते आहे.’ असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित एक कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना असे म्हटले की,“महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे.

दरम्यान,‘महामहीम राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं, त्यांची नेमणूक केंद्राकडून होत, पण राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या