धोनीची निवड माजी खेळाडूला पुन्हा खटकली

dhoni

मुंबई : टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी महेंद्र सिंग धोनीची मेंटॉरपदी निवड झाल्यांनतर चाहते आणि माजी दिग्ग्ज खेळाडूंनी आनंद व्यक्त केला होता. त्याच्या निवडीने संघाला अजून फायदा होईल अशी माहिती बीसीसीआयने दिली होती. मात्र माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यामुळे संघात वाद उध्दभवू शकतो असे सांगितले होते. यानंतर त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. आता पुन्हा एका माजी खेळाडूने माहीच्या मेंटॉर म्हणून निवडीवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केला आहे.

माजी खेळाडू अजय जडेजा यांनी बीसीसीआयवर निशाणा धरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि शास्त्रींच्या मार्गदर्शन संघ चांगले प्रदर्शन करत आहे. सगळं काही सुरळीत सुरु असताना एका रात्रीत भारतीय संघाला मेंटॉरची गरज कशी पडली हे मला समजले नाही. असे वक्तव्य जडेजानी केले आहे. याचबरोबर त्यांनी विराट आणि धोनीच्या नेतृत्वात फरक असल्याचेही सांगितले. सध्या संघाचा खेळ वेगळ्याप्रकारे सुरु आहे.

टी ट्वेंटी वर्ल्डकप साठी संघाची घोषणा झाल्याच्या दिवशीच बीसीसीआयने धोनी मेंटॉर असल्याचे सांगितले होते. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्वतः त्याची निवड केली आहे. संघाला माहीच्या अनुभवाचा मोठा फायदा मिळेल असे ते म्हणाले होते. जिथे या निर्णयाने चाहत्यांना आनंद झाला. तिथेच धोनीची मेंटॉर म्हणून संघात वापसी काही जणांना मात्र खटकली आहे. ज्यात आता माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांचेही नाव सामील झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :