‘..तरीही रोज सकाळी उठून वसुली सरकारचा बेशरम थयथयाट का सुरू होता?’

uddhav thackeray

मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

या मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. केंद्राने लस पुरवली म्हणूनच अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले. तरीही महाविकास आघाडी सरकारवर मोदी सरकारवर का टीका करत आहे असा सवाल त्यांनी केला आहे.

ट्विटमध्ये ते म्हणतात की, ‘महाराष्ट्र लसीकरणात सर्वात पुढे; अडीच कोटी नागरिक झाले लसवंत… राज्य सरकारने लसीचा एकही डोस खरेदी केला नाही. केंद्राने लस पुरवली म्हणूनच अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले ना? तरीही रोज सकाळी उठून वसुली सरकारचा बेशरम थयथयाट का सुरू होता?’ असे म्हणत भातखळकर यांनी टीका केलीये.

लसीकरणात महाराष्ट्र नंबर १
आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

लसीकरणाला आणखी गती मिळणार
मुंबई, पुणे या महानगरांत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने अनेकदा लसीकरणाला ब्रेक लागला. मात्र, त्यानंतरही यंत्रणा अव्याहतपणे काम करत आहेत. आता १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारीही केंद्राने घेतली असून येत्या २१ जूनपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार हे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP