‘मुख्यमंत्र्यांना भेटायला उद्धव ठाकरे सांताक्रुझच्या कॉफीटेल हॉटेलला नाक घासत का गेले ?’

रायगड : सेना-भाजप नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे सहाजिकच जनतेला या दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद सुरु असल्याचं वाटतं असतंं.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडमधून निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात केली. रायगडमधील सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. याच ठिकाणी भाषण करताना पाटील यांनी ठाकरे-फडणवीस यांच्यात गुप्त भेट झाल्याचा दावा केला आहे.

शिवसेना-भाजपमध्ये भांडणं असतात, तर मुख्यमंत्र्यांना भेटायला उद्धव ठाकरे सांताक्रुझच्या कॉफीटेल हॉटेलला नाक घासत का गेले, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पाटील यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.