बँकांनो,तर तुमच्या कर्जवसुलीस माझा असहकार : जिल्हाधिकारी

वाचा बँकांना आपण सहकार्य करणार नाही, असे सांगण्याची वेळ जिल्हाधिकाऱ्यांवर का आली ?

सोलापूर – बचत गटांचे खाते उघडणे, पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, स्टॅण्डअप योजना, जिल्हा उद्योग केंद्राने दिलेले प्रस्ताव, कर्जमाफीची आकडेवारी पीककर्जाचे उद्दिष्ट याकडे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. बडोदा बँक, अॅक्सिस बँक आणि इतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीलाच दांडी मारली. बँकांना शासनाकडून स्पष्ट आदेश असतानाही बँक अधिकारी दुर्लक्ष करत असल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.बँकांची भूमिका अशीच राहिली तर सरफेसी कायद्यानुसार वसुलीच्या कारवाईच्या वेळी बँकांना आपण सहकार्य करणार नाही, असे सांगण्याची वेळ जिल्हाधिकारी यांच्यावर आली. विशेष म्हणजे विविध शासकीय योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी आलेल्या नागरिकांना राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी लोकांना चुकीची माहिती देऊन पिटाळून लावत असल्याचे अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेची आढावा बैठक पार पडली. बैठकीस रिझर्व्ह बँकेचे मोहन सांगवेकर, डीआरडीएचे प्रकल्प संचालक ए.जी. नवाळे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, नाबार्डचे व्यवस्थापक प्रदीप झिले, जिल्हा अग्रणी बँकेचे सुरेश श्रीराम उपस्थित होते.लीड बँकेचे व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी जिल्ह्यातील बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट सलग तीन वर्षे पूर्ण केले नाही, किमान यावर्षी उद्दिष्ट पूर्ण करावा, अशी विनंती केली. मात्र यावर एकाही बँकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना उद्दिष्ट पूर्ण करण्याचा शब्द दिला नाही. ज्या बँकांनी उद्दिष्ट पूर्ण केले नाही, जे बँक अधिकारी बैठकीस गैरहजर आहेत त्यांना नोटीसा द्या आणि त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी सुरेश श्रीराम यांना दिले आहेत.११ बँकांनी एकाही खातेदाराला दिले नाही कर्जआंध्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, कर्नाटका बँक, रत्नाकर बँक, इंडसइंड बँक, बंधन बँक जिल्हा बँक यांनी रब्बी हंगामात एकाही शेतकऱ्यास कर्ज दिले नाही. तर अलाहाबाद बँक लाख, इंडियन बँक लाख १७ हजार, युको बँक लाख ५० हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. स्टेट बँकेने सर्वाधिक हजार ८७१ खातेदारांना ९४ कोटी ८३ लाख बँक ऑफ इंडियाने हजार ४७४ खातेदारांना ६२ कोटी २४ लाखांचे कर्ज दिले आहे.

You might also like
Comments
Loading...