Sushma Andhare | कोल्हापूर : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणुन कमी कालावधीत अधिक प्रसिद्ध झालेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जिरदार हल्लाबोल केला आहे. शिवबंधन सोडायला तयार असल्याचं सांगत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सुषमा अंधारे (Sushma Andhare) या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
त्या म्हणाल्या, “शिवबंधन सोडून मी किरीट भाऊंच्या नावाचा गंडा बांधते. पण त्यांनी राणेचा बंगला अधिकृत आहे का? नसेल तर राणेंचा बंगला का तोडला नाही ते सांगावं.” तसेच भाजपमध्ये आल्यानंतर आरोप असलेल्या नेत्यांची कारवाई थांबते. भाजपकडे असं कोणतं वॉशिंगमशीन आहे? हे एकदा भाजपनं स्पष्ट करावं, असं आव्हान सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिलं आहे.
भाजपा कपटी कारस्थानी करणारी आहे. भाजपने द्वेषमूलक राजकारण सुरू केलं आहे. हे राजकारण संपून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. त्याबरोबरच येत्या 20 तारखेला उद्धव ठाकरे 9Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांची भेट होणार होती. पण वंचित कडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या. वंचितकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्या म्हणाल्यात.
40 आमदार आम्हाला सोडून गेले असले तरी पुन्हा 40 आमदार निवडून आणणार आहोत. संजय राऊत (Sanjay Raut) तर म्हणाले आहेत 103 दिवस आत राहिलो 103 आमदार निवडून आणेन आणि आम्ही ते करून दाखवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शिंदे गट हा माझा भाऊच आहे. शिंदे गटात गेलेल्यांना आता पश्चाताप होत आहे, असा दावा त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Vivo Mobile Launch | भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा ‘हा’ Mobile
- Ambadas Danve | “भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर…”; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला!
- Ashish Shelar | शेलारांच्या सुरक्षा रक्षकाला महिलेची मारहाण, गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?
- “पाकिस्तानी कलाकारांना काम दिल्यास…” ; मनसेची बॉलीवूडला खुली धमकी
- Sanjay Raut | “हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा