fbpx

शरद पवारांनी ‘पगडी’चे वक्तव्य आत्ताच का केले ?- संभाजी ब्रिगेड

shrad pawar pagadi

अहमदनगर: पवारांचा विचार हा बहुजनवादी होता. ते आणि त्यांचे कुटुंब हे सत्यशोधक चळवळीतून पुढे आले आहे. याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांनी हे वक्तव्य अत्ताच का केले हा ही प्रश्न आमच्या सारख्यांना पडला आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा आज नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजी ब्रिगेड आगामी काळात लोकसभा व राज्यसभेच्या जागा या स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही मोर्चामध्ये सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करावे असं म्हंटलं होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील वर्धापन दिनानिमीत्त आयोजित मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली होती.