संघाने प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंना कां कधी बोलावले नाही ?- संजय राऊत

balasaheb thakare

पुणे: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या संघ भेटीवर राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रखर हिंदुत्ववादी नेते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना कधी नागपूरला मार्गदर्शनासाठी कां बोलावले नाही ? असा प्रश्न उपस्थीत केला आहे. एका वृत्तवाहिनीशी संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, भविष्यात भाजपला बहुमत मिळणार नाही, त्यावेळी सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींचे नाव पुढू येवू शकते. यासाठी ही संघाची पुर्वतयारी दिसते. संघ कोणतीही गोष्ट उगीच करीत नाही. त्या पाठीमागे आडाखे असतात, लांब पल्ल्याचा विचार असतो. असे राऊत म्हणाले.

प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवकांना मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, मी मुखर्जी यांच्या जागी असतो तर संघाचे हे निमंत्रण कधीही स्वीकारले नसते. तसेच मी संघाला सांगितले असते की, त्यांचा दृष्टिकोन व विचारधारा चूक आहे, असं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हंटलं होते.