fbpx

‘त्या’ फाईलवर सही करतांना भुजबळांनी सदसद्विवेकबुद्धीचा वापर का केला नाही ?- मुनगंटीवार

bhujabal vr mungantiwar

नाशिक : बाळासाहेब ठाकरे अटकेच्या आदेशाची फाईल आपल्या कार्यकाळात नव्हे, तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात तयार झाली होती.त्या फाईलवर मी फक्त सही केली. असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला. त्यावर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची फाईल युती सरकारच्या कार्यकाळात तयार झालेली नसेलच, पण एखाद्या विभागाने फाईल समोर आणली, तर त्यावर सही करताना मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धी वापर का केला नाही ? असा प्रश्न अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार हे आज वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत सवांद साधला.

काय म्हणाले होते छगन भुजबळ ?

“गृहमंत्री झाल्यानंतर सगळ्या फाईल पुढे गेलेल्या होत्या. मात्र नेमकी बाळासाहेबांच्या अटकेचीच फाईल माझ्यासमोर आली. पोलिसांनी सांगितलं यावर कारवाई करायला पाहिजे. त्यानंतर त्या फाईलवर फक्त सही केली, ती फाईल माझ्या कार्यकाळात तयार झाली नव्हती,”