हिमेश रेशमियाने मुंबईत फ्लॅट घेऊन देण्याचे का दिले वचन; रानूने केला खुलासा

हिमेश रेशमियाने मुंबईत फ्लॅट घेऊन देण्याचे का दिले वचन; रानूने केला खुलासा

Ranu,Himesh Reshammiya

मुंबई : रोतारात स्टार बनलेली रानू मंडल (Ranu Mandal) सर्वपरिचित आहे. तिचा ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाने (Himesh Reshammiya) रानू मंडल यांना त्याच्या चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू यांना मुंबईत फ्लॅट देण्याचे देखील वचन दिले होते. आता हिमेशने फ्लॅट देण्याचे वचन का दिले रानू यांनी याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

नुकताच रानू मंडल यांनी एका यूट्यूबरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हिमेश रेशमियाने मुंबईत फ्लॅट घेऊन देण्याचे वचन दिल्याचे सांगितले. त्या मागील कारण देखील रानू यांनी सांगितले आहे. यूट्यूबरने रानू मंडल यांना ‘मुंबईमध्ये तुमचे काय काय आहे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत रानू मंडल म्हणाल्या की, ‘हिमेश यांनी मला सांगितले होते की फ्लॅट खरेदी करुन देईन. कारण ते जेव्हा मला मुंबईत बोलवायचे तेव्हा २ ते ३ दिवस मला तेथे थांबावे लागते. त्यानंतर परत इकडे यावे लागते. त्यामुळे त्यांनी मला मुंबईत प्लॅट घेऊन देण्याचे वचन दिले होते. जेणे करुन मला मुंबईत राहूनच शुटिंग वैगरे करता येईल. मुंबईत राहाणे, तेथील जेवण मला प्रचंड आवडते.’ असा खुलासा रानूने केला.

रानू मंडल यांचा रेल्वे स्थानकांमध्ये गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका हा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून प्रेरीत झालेल्या चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलने रानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता रानू पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

रानू मंडलचे काही फोटो.

 

महत्वाच्या बातम्या: