तर मग हमीद अन्सारींनी आधीच राजीनामा का दिला नाही; संजय राऊत

देशातील मुस्लिमांत असुरक्षिततेची भावना असल्याचे विधान केल्याने मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारीवर भाजप शिवसेनेची टीका

वेबटीम : मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशातील मुस्लिमांत असुरक्षिततेची भावना असल्याचे विधान केले आहे. अन्सारी यांच्या या विधानानंतर आता भाजप तसेच शिवसेनच्या नेत्यांकडून संतप्त टिप्पणी करण्यात येत आहे. हमीद अन्सारी याचं विधान त्यांच्या पदाला शोभणार नसल्याच भाजप नेत्यांनी म्हंटल आहे. तर जर अन्सारींना मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना दिसत होती तर त्यांनी आधीच राजनीमा देऊन जनतेत जायला हवं होतं, अस म्हणत शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अन्सारींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

‘हमीद अन्सारींना देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षितता दिसत होती तर मग त्यांनी  आधीच राजीनामा का दिला नाही. आता आपला कार्यकाळ संपल्यानंतर ते अशाप्रकरे  विधान करत आहेत. त्यामुळे त्यांनी आधीच पदाचा राजीनामा देऊन जनतेमध्ये जायला हवं होतं. अल्पसंख्याक मुस्लिमांसाठी देशातील बहुसंख्य हिंदूंकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं जातं. देशाची संपूर्ण ताकद मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी लावली आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

देशाच्या मुस्लीम समाजामध्ये असुरक्षिततेची भावना

“देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक असल्याच” विधान मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले आहे.

You might also like
Comments
Loading...