मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे बंड प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. तर शिवसेनेला गळतीचे ग्रहण लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला आव्हान देत म्हटले की, “फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू” मात्र यावर शिवसेनेचेच नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टोला लगावला आहे.
“ही आव्हाने द्यायची वेळ नसून आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री निघून का गेले हे समजून घ्यायला हवे. मी तेव्हाही सांगितलं होतं की, आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका? शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले व आपल्या कोट्यातील तीन मंत्री पद अपक्ष आमदारांना का दिली?”, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.
दरम्यान सकाळपासून नॉट रिचेबल असलेले भास्कर जाधव शिंदे यांच्या गटात शामिल झाले काय, अशा चर्चा सकाळपासून रंगत होत्या. मात्र जाधव यांनी चिपळूण येथे हजेरी लावत या चर्चांना उधळून टाकले.
महत्वाच्या बातम्या:
- pravin darekar : “राज्यसरकारकडून अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश…” ; भाजपकडून राज्यपालांना पत्र
- Assam Congress : आसाम कॉंग्रेसचा एकनाथ शिंदेंना इशारा, राज्य सोडण्याचे दिले आदेश
- VIDEO : विराट कोहलीनं केली जो रूटच्या ‘त्या’ गोष्टीची नक्कल; मायकेल वॉननं उडवली खिल्ली!
- Hemangi Kavi : ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं? हेमांगीच्या या पोस्टवर कमेंटचा वर्षाव
- Sanjay Shirsat : “मतदारांना न भेटता मुंबईत अनेक ‘रात्री’ कुठे घालवता…” ; शिवसैनिकांचा संजय शिरसाटांवर पलटवार