निवडणुका आल्यावरचं भाजपवाल्यांना भारतरत्न का आठवला? : सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपेल संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. या संकल्प पत्रातून भाजपने अनेक आश्वासन दिली आहेत. त्यात सर्वात महत्वाचे आश्वासन म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे संकल्पपत्रात म्हंटले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ठाणे येथे प्रचारार्थ आल्या असताना सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी सुळे म्हणाल्या की, भाजपचे संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस आहे. भाजपने संकल्पपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात मी ही मागणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोकसभेत करत आहे. विशेष म्हणजे त्यावेळीही भाजपचे सरकार होते. मग निवडणुका आल्यावरचं भाजपवाल्यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी आपले संकल्पपत्र प्रकाशित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली. गेल्या पाच वर्षांत जे काम झाले. त्याचा अनुभव आणि भविष्यातील दिशा लक्षात घेवून हे संकल्पपत्र तयार केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत या ‘संकल्प पत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...