fbpx

डॉन दाऊद इब्राहीमचे नाव घेतलं की बारामतीकरांना का झोंबतं ?   

टीम महाराष्ट्र देशा- डॉन दाऊद इब्राहीमचे नाव घेतलं की बारामतीकरांना का झोंबत असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे.  सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना आंबेडकर पवार तसेच कॉंग्रेसवर चांगलेच बरसले.

 पवार यांच्यावर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले, मुंबई बॉम्बस्फोटामागं केवळ पाकिस्तानी नाही तर इथले राजकारणीही जबाबदार आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाला जनता वैतागली असून आता सर्व सूज्ञ झाले असल्याचं आंबेडकर यांनी म्हटले. तर कॉंग्रेसवर आरोप करताना काँग्रेसचे ३० टक्के उमेदवार हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही नाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले.
दरम्यान,यापूर्वीच १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम पोलिसांना शरण येण्यास तयार होता, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असा देखील घणाघाती आरोप  प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दाऊदने राम जेठमलानी यांच्या मार्फत हा प्रास्तव पवारांकडे दिला होता, अस देखील आंबेडकर म्हणाले.