शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही? बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल

dada bhuse vs babanrav lonikar

जालना : लॉकडाऊन, अतिवृष्टी, कीड यासारख्या संकटांना सामोरा जाणारा शेतकरी पुरता दबून गेला. कांद्याला सुगीचे दिवस आले असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सुरुवातीला लाखो टन कांदा सीमाभागात तर अडकलाच आणि देशासह राज्यातील कांद्याचा भाव देखील कोसळला.

तर, विदर्भासह मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतात पाणी साचल्यामुळं हाताशी आलेली पिकं कुजली आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आल्याने नदी लगतची शेतीच वाहून गेल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शेतकरी हवाल दिल झाले आहेत.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे. माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर करावी, अशीही मागणी लोणीकरांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे.

“कृषी मंत्री दादासाहेब भुसे हे स्वतःला शिवसेनेचे ढाण्या वाघ असल्याचे म्हणतात, मग ते शेतकऱ्यांना तात्काळ मदत का करु शकत नाहीत ?” असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे. शेतकरीवर्गाने पीक विमा भरला, आता प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतात पाणी साचलं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपन्यांकडे मणूष्यबळ नाही. जालन्यात रिलायन्स पीक विमा कंपन्यांचे फक्त तीन कर्मचारी आहेत. ते कसे काय संपूर्ण जिल्ह्यातील शेतीची पाहणी करणार आणि पंचनामे करणार, असा प्रश्न देखील त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-