कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते पद जाण्याच्या भीतीनेच होईना नितेश राणेंवर कारवाई ?

नितेश राणे

नारायण राणे यांच्या पुनर्वसानाबद्दल काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या घरी बैठक पार पडली, यावेळी राणे यांचे पुत्र आणि टेक्निकली कॉंग्रेस आमदार असणारे नितेश राणे देखील उपस्थित होते. दरम्यान, राणे यांनी कॉंग्रेस सोडल्यापासून नितेश यांनी त्यांच्यासोबत स्टेजवर जाण टाळले होते. तसेच एवढं होवूनही कॉंग्रेस मात्र नितेश यांच्यावर कारवाईस धजावत नाहीये.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या 11 अकबर रोड निवासस्थानी काल मध्यरात्री शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे आमदार नितेश राणे, भाजपचे आशिष शेलारही उपस्थित होते

नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी देवून अनेक महिने उलटले आहेत. मात्र तरीही अद्याप त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. दरम्यान, आता राणे यांना राज्यात मंत्रीपद देयच कि राज्यसभेत खासदारकी यावर काल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे राणे यांचे पुत्र नितेश राणे हे अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत. या बैठकीवेळी तेही उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. टेक्निकली कॉंग्रेस आमदार असणारे नितेश राणे यांची शहा भेट कॉंग्रेस का खपवून घेत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते पद कॉंग्रेसकडे आहे. मात्र नितेश राणे यांच्यावर कारवाई केल्यास ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाऊ शकते त्यामुळेच कॉंग्रेस नितेश राणेंवर कारवाई करण्यास धजावट नसल्याचे बोलल जात आहे.