मुख्यमंत्री बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास का घाबरतात ? : जयंत पाटील

jayant patil vr cm

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.

शिवस्वराज्य यात्रा ही गेवराई येथे आली असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ‘आज आपण मुंबई आणि दिल्लीचे राज्य पाहिले आहे. लोकसभेत भाजपाला जास्त जागा आल्या. आज ईडीच्या बाबतीत मुख्यमंत्री म्हणतात काही केल नसेल तर भीतीचे कारण नाही. मग आपण बॅलट पेपर वर निवडणूक घेण्यात आपण का घाबरता? असा प्रश्न विचारला आहे.

तसेच पुढे बोलताना ‘देशात अनेक दुष्परिणाम दिसत आहे. आर्थिक मंदीचे सावट संपूर्ण देशात आहे. काँग्रेसच्या हाती देश असताना अशी स्थिती कधीच आली नव्हती. बेरोजगारीचे प्रमाण देशात वाढत आहेत. टेल्को, जेट एअरवेज सारख्या ६ लाख कंपन्या बंद झाल्या आहेत. आपल्या देशाचे आर्थिक तज्ज्ञ सांगतात की ही मंदी आजवरची सर्वाधिक मोठी मंदी आहे. आज या सत्ताधाऱ्यांकडून अर्थकारणाशी खेळ झाला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ‘मागची लोकसभा निवडणूक आपण भावनेने निवडून दिली, पण आता विचार करून मत देण्याची गरज आहे. भाजपाच्या नेत्यांनी मागील विधानसभेवेळी १८३ आश्वासन दिली होती. त्यातील १४८ आश्वासनांवर काहीच काम झालेले नाही. पण आता ही आश्वासनं २०३० पर्यंत असल्याचं सांगितलं जातंय, हे आपले दुर्दैव आहे अशी टीका पाटील यांनी भाजपवर केली.