भाजपला एखाद्याचा धर्म विचारायचा अधिकार कोणी दिला; स्वामी नारायण मंदिराच्या पुजा-याचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा: देव हा सर्वासाठी सारखा असतो त्यामुळे देवळात हिंदू आले कि अहिंदू यावर भाजपाला एखाद्याचा धर्म विचारायचा अधिकार कोणी दिला, असा सवाल स्वामी नारायण मंदिराच्या पुजा-यानी केला आहे. तसेच हिंदू अथवा अहिंदू मंदिरात आले तर भाजपला काय समस्या आहे अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात प्रचारा दरम्यान सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी मंदिराच्या रजिस्टरवर अहिंदू म्हणून नोंद करण्यात आल्याच उघड झाल्यावर मोठा वाद निर्माण केला जात आहे. दरम्यान रजिस्टरमध्ये राहुल गांधी यांनी स्वत: अहिंदू म्हणून नोंद केली नसल्याचही त्यांनी सांगतील आहे.