मोदींच्या गुजरातमध्ये दलितांचा मिशावाला सेल्फी ट्रेंडिंगवर: वाचा का ?

गुजरातमध्ये#DalitWithMoustache हा हैश टैग ट्रेंडिंग

वेब टीम :गुजरातमध्ये मंगळवारी मिशा ठेवल्यामुळे दलित तरुणावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . एका १७ वर्षीय दलित तरुणावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी ब्लेडने हल्ला करून जखमी केल्यामुळे गांधीनगर मध्ये काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले .  गुजरातमध्ये दलितांवर वाढत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील दलित तरुणांनी सोशल मिडीयावर आवाज उठवत मिशा ठेवलेला आपला फोटो शेअर करत या हल्ल्यांचा निषेध व्यक्त करायला सुरवात केली आहे .

गरबा पहायला आलेल्या दलित तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना केवळ मिशा ठेवल्यामुळे या तरुणावर झालेल्या हल्ल्यामुळे गुजरातमध्ये दलित सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे .सोशल मिडीयावर निषेध व्यक्त करताना शेकडो दलित तरुणांनी डीपी (डिस्प्ले पिक्चर) बदलून आपला मिशावाला फोटो अपलोड केला आहे .याशिवाय रुबाबदार मिशा, मिस्टर दलित असं लिहलेला आणि वर राजमुकुट असलेला देखील डीपी मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.फ़ेसबुक आणि ट्विटरसुद्धा #DalitWithMoustache हा हैश टैग चालवला जात आहे.दलितांवरील हल्ले रोखण्यासाठी गुजरातमधील भाजप सरकार काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे .

You might also like
Comments
Loading...