मुबंई : महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू आहे. यावर्षीच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार यासगळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच सामजिक कार्यकर्त्या तथा भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईं सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये उत्तर सभा घेतली होती. त्यानंतर तृप्ती देसांईंनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून “राजसाहेब आपने सबको धो डाला”, असं म्हणत त्यांचे कौतुक केले होते. परंतू त्यांच्या या पोस्टला अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचजणांनी राज ठाकरेंच्या सभेमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे राहून गेल्याचं म्हटलं आहे.
अशातच आणखिण एक पोस्ट करत तृप्ती देसाईंनी राज ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. “मी परवा दिवशी राजसाहेब ठाकरे यांच्यावर पोस्ट लिहिली होती त्यावर ते महागाईसह अनेक विषयावर का बोलले नाहीत असे अनेक जणांचे म्हणणे आहे. सगळ्या अपेक्षा राज ठाकरेंकडूनच का बरं करायच्या, इतर पक्षातील नेते बोलतील ना, असं त्या म्हणाल्या आहेत.
तसेच, “राज साहेबांना जेंव्हा जो मुद्दा मांडायचा आहे तेव्हा ते मांडतील .तुम्हाला काही मुद्दे त्यांनी मांडले नाही म्हणून वाईट वाटत असेल परंतु इतर नेत्यांनाही असे सल्ले द्यावेत. खरंतर अशा पोस्ट स्वतःहून लोकं लिहितात की, त्या त्या पक्षाच्या PR एजन्सी एखाद्या नेत्याविषयी गैरसमज पसरवण्यासाठी अशा विविध पोस्ट तयार करतात ,थोडसं कोड्यात टाकण्यासारखे आहे-तृप्ती देसाई.”
महत्त्वाच्या बातम्या :