‘कोण काकडे?’ मला माहित नाही संजय राऊत यांचा पलटवार

sanjay raut

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली होती. यावर संजय काकडे यांनी शिवसेनेने असे केल्यास शिवसेनेचा मनसे होईल अस वक्तव्य केले होत. या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचं नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ ५ तर भाजपचे २८ खासदार निवडून येतील, असा अंदाज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला होता.

संजय काकडे यांनी पुण्यात केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी ‘कोण काकडे?’ अशा शब्दात पलटवार केला आहे. जे अशी तुलना करतात, त्यांनी त्यांचे डोके तपासून पाहायला हवे त्यांच्या डोक्यात मेंदू कुठे आहे. हे त्यांनी डॉक्टरांकडून तपासून पाहावे. ते स्वतः विषयी बोलत असतील. युती आता तुटली नसून चार वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने तोडल्यावर आणि मोदींची लाट असताना सुद्धा स्वबळावर ६३ आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. तेच आता २०१९च्या निवडणुकीत १५० होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.