कोण रामदास आठवले? : प्रकाश आंबेडकर

रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगरला राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलत असतांना शरद पवारांच्या राजकीय चारित्र्यावरच शंका निर्माण केली. तसेच अनियंत्रित हिंदू संघटनांचा त्रास सर्व हिंदूंना होत असून यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. असे बोलून त्यांनी करणी सेनेवर देखील टीका केली आहे. रामदास आठवले बाबत, कोण रामदास आठवले? असं विचारत आठवलेंची अवहेलना केली.

Loading...

रामदास आठवले आणि ऐक्यावर बोलताना कोण रामदास आठवले असं विचारत प्रकाश आंबेडकरांनी त्यांची अवहेलना केली. आठवले यांना आपण ओळखतच नसल्याचं त्यांनी दाखवलं. तर राजकीय पक्ष जातीचे पक्ष असतील तर देशाचं काय होईल, असा सवाल करत जातीय टोळीतील ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर भिडे गुरुजी आणि पीएमओ कार्यालयाचा संबंध उघड करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला. याबाबत आपल्याकडे ऑडिओ, व्हिडीओ आणि कागदोपत्री पुरावे असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.Loading…


Loading…

Loading...