ऐकावं ते नवलचं … फक्त अध्यक्षाचा नव्हे तर संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश

भाजप

टीम महाराष्ट्र देशा- देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत.इतर पक्षांच्या तुलनेत भाजपात मोठ्याप्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. याआधी फक्त भाजपात एक एक नेता दाखल होत होतं मात्र आता एका पक्षाच्या अध्यक्षासह संपूर्ण पक्षच भाजपात दाखल झाला आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थित भाजप मुख्यालयात त्यांनी भाजप प्रवेश केला. भाजपचे माजी खासदार असणाऱ्या स्वैन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उत्कल भारत हा नवा पक्ष काढला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत.