राज ठाकरेंची चौकशी: पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित आणि सूनही ईडीच्या कार्यालयात जाणार

टीम महाराष्ट्र देशा: कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खबरदारीचा म्हणून मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांना ताब्यात घेतले, मनसे पदाधिकाऱ्यांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरु आहे.

राज ठाकरे सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहचणार आहेत, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे हे देखील ईडी ऑफिसला जाणार आहेत.

कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणी राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची दोन दिवसांपासून चौकशी केली जात आहे.

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, कार्यकर्त्याने पेटवून घेत आयुष्य संपवले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्या नेत्यांला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याच्या मानसिक तणावामधून एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण चौगुले असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही

ईडीकडून राज ठाकरे यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अडचणीच्या प्रसंगी उद्धव ठाकरे भावाची पाठराखण करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या