(Grampanchayat Election 2022) महाराष्ट्र देशा : राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगलेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप आणि शिंदे गटाला मिळून एकूण ३५१ जागांवर विजय मिळवता आला आहे तर महाविकास आघाडीला एकूण ४५१ ठिकाणी विजय मिळाला आहे. तर इतर पक्षांना २६७ जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपकडून आम्हालाच जास्त जागा मिळाल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असली तरी आघाडी आणि युतीचे निकाल पाहिल्यास आघाडीने चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. ८८९ पैकी ३९७ ठिकाणी म्हणजेच जवळपास ४०० ठिकाणी भाजपा निवडून आली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहते.
आमच्यासोबत असलेली बाळासाहेबांची शिवसेना आहे ती ८१ ठिकाणी निवडून आली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ८७ ठिकाणी निवडून आलेली आहे. काँग्रेस-१०४ ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ९८ ठिकाणी आहे. अपक्ष ९५ ठिकाणी आहेत. अशी माहिती फडणवीस यांनी दिलीय. याचा अर्थ असा आहे की, भाजपा पुन्हा एकदा सगळ्या मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे”, असंही ते म्हणालेत.
नागपुरात काँग्रेसने खात उघडलं
नागपुरात काँग्रेसने खातं खोललं आहे. नागपुरातली अंभोरा ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. या ठिकाणी राजू कुकडे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. तर नाशिकच्या उंपरपाड्यात महाविकास आघाडीचा सरपंच झाला आहे.
नाना पटोलेंच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत कमळ फुललं
भंडारा जिल्ह्याच्या साकोली मतदारसंघातील ग्रामपंचायतीत कमळ फुललं, शिरेगाव ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता कोल्हापुरात ७ ग्रामपंचायतपैकी ४ राष्ट्रवादीकडे, तर ३ शिंदे आणि भाजपाकडे.
रायगडात शिंदे गटाच्या आमदार गोगावलेंना झटका; खरवली ग्रामपंचायतीवर मविआचा झेंडा
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात भरत गोगावले यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखता आले नाही. बंडखोरी केल्यानंतर प्रतिष्ठा पणाला लावत आमदार भरत गोगावले ग्रामपंचायत निवडणूकीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ म्हणून उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, जनतेने त्यांच्याच गावात त्यांना जोर का झटका दिला आहे. गोगावलेंच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी काँग्रेसचे चैतन्य म्हामूणकर यांना जनतेने कौल दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | “विनायक राऊत यांना पाडण्यासाठी…”, शहाजीबापू पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया
- Shivsena । “गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे”; ठाकरे गटाचा इशारा
- Maharashtra Rain Update | राज्यात मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता
- Ajit Pawar | अजित पवार अडचणीत येणार! ‘या’ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून होणार चौकशी
- Sachin Sawant | “राज ठाकरेंना महाराज कळले असते तर…”; काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला