पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची लढाई कोण जिंकणार? उद्या मतदान

uddhav-and-fadnavis

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेना व भाजप नेत्यांनी एकमेकांचे वाभाडे काढले. आजवर कधी न पाहिलेला शिवसेना- भाजपमधील सत्ता संघर्ष पालघरमध्ये पहायला मिळाला. राजकीय स्वार्थासाठी मित्र कशे शत्रू होतात हे राज्याने नाही तर देशाने अनुभवले. ३ आठवड्यांपासून शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात राजकीय मैदानात उतरले. मात्र काल (शनिवारी) सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या.

Loading...

शिवसेनेने भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटतांना पकडून व व मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सीडी ऐकवून, प्रचाराच्या अंतिम चरणात विजयी षटकार खेचला. मुख्यमंत्री अहंकारी आहेत, भेसळीचे रक्त, भगवे रक्त अश्या प्रकारे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर शाब्दिक वार केले. पालघर मध्ये उद्या मतदान होणार असून शिवसेनेचा विजयी षटकार यशस्वी ठरेल ? कि भाजप आपला विजयी घोडदौड सुरु ठेवेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Loading…


Loading…

Loading...