निलंगेकरांच्या गडाला राष्ट्रवादी सुरुंग लावणार का ?

निलंगा/प्रा.प्रदीप मुरमे- ‘निलंगेकरांचा’मतदारसंघ म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या ‘निलंगा’विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदूरे यांना ‘आमदार’कीचे डोहाळे लागल्याने मागील काही महिन्यापासून ते पायाला भिंगरी लावून या मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेच्या सातत्याने संपर्कात आहेत.

Loading...

राज्याचे माजी मुख्यमंञी तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे १९६२ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.परंतु मागील २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी न लढविता त्यांचे सुपूञ काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी लढविली.दरम्यान अशोकराव यांना घराण्यातील भाऊ बंदकीमुळे त्यांचे पुतणे भाजपाचे संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडूनच पराभूत व्हावे लागले.१९६२ पासून आजतागायत १९९५ चा जनतादलाचे काँ.माणिकराव जाधव यांचा एकमेव अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघाचे नेतृत्व ‘निलंगेकर’ घराण्यातील व्यक्तीनेच केले.

डाँ.निलंगेकर यांच्याबरोबरच दिलीप शिवाजीराव निलंगेकर व संभाजी दिलीप निलंगेकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले.परिणामी तब्बल ६ दशकापासून या मतदारसंघावर ‘निलंगेकर’घराण्याचाच बोलबाला राहिला आहे.त्यामुळेच राज्यात या मतदारसंघाला ‘निलंगेकरांचा’मतदारसंघ असे म्हंटले जाते.निलंगा म्हंटलं की निलंगेकर घराणे असे जणू एक अलिखीत राजकीय समीकरणच बनलं आहे.परंतु निलंगेकरांच्या या राजकीय साम्राज्याला जोरदार शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे बगदूरे हे नियोजनबध्द मोर्चेबांधणी करत आहेत.

संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून अवयवदानाचा संकल्प

मागील विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघात काँग्रेसचे अशोकराव निलंगेकर यांचा पराभव झाल्याचे कारण पुढे करत हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावा अशी मागणी बगदूरे यांनी पक्षश्रेष्ठीकडे लावून धरली आहे.नुकतच दिपावली शुभेच्छाच्या निमित्ताने विनायक बगदूरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामतीत भेट घेवून निलंगा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा यासाठी साकडे घातले.एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार येथून निवडून आणू अशी ग्वाही साहेबांना देण्यासही राष्ट्रवादीचे हे शिष्टमंडळ विसरले नाही!

आपल्या ‘अभियंता’ या पदाच्या शासकीय सेवेचा राजीनामा देवून गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून काम करणारे बहुजन चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करुन पुढे आलेले नेतृत्व म्हणजे विनायक बगदूरे हे होय.बगदूरे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाच्या मागणीची शरद पवार साहेब नेमकी कशी दखल घेतात याकडे या मतदारसंघातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे,हे माञ निश्चित!

दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही,पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

निवडणुकीच्या आखाड्यात यापुढे उतरणार नाही : पवारLoading…


Loading…

Loading...