नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी कोहली आणि गांगुली यांच्यात झालेल्या मतभेदावर भाष्य केल आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या वतीने विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या मुद्द्यावर बोलायला नको होते. असे त्यांनी म्हंटले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीच्या ऐवजी रोहित शर्माकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवले होते. ज्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बोर्डाला एकदिवसीय आणि टी-२० चे कर्णधार सारखेच हवे होते, त्यामुळे विराटकडून वनडेचे कर्णधारपद हिसकावण्यात आले. टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने स्वतःहून टी-20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. गांगुलीने सांगितले की, मी विराटशी टी-20 चे कर्णधारपद न सोडण्याबाबत बोललो होतो.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले की, बीसीसीआयमधील कोणीही त्याला टी-20 कर्णधारपद सोडण्यास सांगितले नाही.
वेंगसरकर पीटीआयशी संवाद साधताना म्हणाले, निवड समितीच्या वतीने गांगुलीने बोलण्यात काही अर्थ नाही. ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी निवड किंवा कर्णधारपदावर बोलायला हवे होते. गांगुली म्हणाला होता की विराटच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला कारण दोन मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वेगळे कर्णधार असण्यात काही अर्थ नाही. वेंगसरकर म्हणाले, कर्णधार निवडायचा की काढून टाकायचा हा निर्णय निवड समितीचा आहे. ते गांगुलीच्या अखत्यारीत येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- सचिन सावंतांनी शेअर केला मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडीओ