सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये संपली असतील तर, दिल्लीला परत या – शत्रुघ्न सिन्हा

टीम महाराष्ट्र देशा: सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये आणि लांबलचक आश्वासनं संपली असतील तर, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने गुजरात सोडून दिल्लीला परत यावं, जे श्रेय घेण्यासाठी भांडत आहेत, असे सर्व मंत्री, मंत्रालय, गुजरातमध्ये बसलेल्या सरकारनेही आता परतायला हवं, ‘जर आपण विजयी झालो तर आम्हाला माहीत आहे की, याचे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल. पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? एक जुनी म्हण आहे, ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’. मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मला अपेक्षाही आहे की, गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो. जय हिंद जय गुजरात ! अशा आशयाच ट्विट करत शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने गुजरात सोडून दिल्लीला परत यावं, अस म्हणण्याचा सरळ रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगळी कडे आहे. पक्षात नाराज असलेले शत्रुघ्न सिन्हा हे कायमच पक्षनेतृत्वावर टीका करत असतात.

अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजरात निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या तब्बल ३४ झंजावती सभा गुजरात मध्ये झाल्या. याकडेच बोट दाखवत शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत नेतृत्वावर निशाणा साधला आहे.