‘जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार’

टीम महाराष्ट्र देशा : नेहमी शिवसेनेवर निशाणा साधणारे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार असे टीका करणारे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीत शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारीही झाली आहे.

दरम्यान आजच्या शपथविधीत ६५ खासदार केंद्रीयमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ७ खासदारांचा समावेश आहे. केंद्रीयमंत्री मंडळात शिवसेनेला १ स्थान मिळाले आहे. तर शिवसेनेकडून खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव, तसेच विनायक राउत, यांचे नाव आगःडीवर होते, मात्र शिवसेनेकडून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Loading...

विशेष म्हणजे, भावना गवळी या एकमेव महिला लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. सलग पाचव्यांदा त्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांन मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. परन्तु शिवसेनेन अरविंद सावंतचे नावावर शिक्कामोर्तब केल्याने भावना गवळी नाराज झाल्याचे वृत्त आले होते.

याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवेनेवर निशाणा साधत ट्विट केले आहे. जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार. यालाच म्हणतात उद्धव ठाकरे. असे टीका करणारे ट्विट निलेश राणे यांनी केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील