fbpx

मुख्यमंत्री एका एका सहकाऱ्याचा काटा काढतात

ajit pawar & devendra fadanvis

मुबंई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तावातावाने विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यावेळेस अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाब्दिक चिमटे काढले.

अजित पवार म्हणाले, जर मुनगंटीवारांचा घसा बसला तर अर्थसंकल्प कोण मांडणार. मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता. तुम्ही एकेकाचे काटे काढत आहात, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. पवारांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील कारवाईची मागणी केली. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. या गोंधळातच राज्यपालांचं भाषण सुरु होतं.

या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली.

1 Comment

Click here to post a comment