‘मिशन शक्ती’ला परवानगी दिली कुणी?

भारताचं अंतराळातलं हे सर्वात मोठं यश आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झालीय. या प्रकल्पाला युपीए सरकार असतानाच मान्यता दिली होती असा दावा काँग्रेसने केला आहे.

या मोहिमेला नेमकी परवानगी कुणी दिली? यावर जोरदार वाद-प्रतिवाद होत आहे. युपीएचं सरकार असताना या मोहिमेचं प्रेझेंटेशन DRDO ने त्यावेळी दिलं होतं मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या मोहिमेला परवानगी दिली नाही अशी माहिती पुढे आली आहे.

DRDOचे माजी प्रमुख डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी हा खुलासा केला ते म्हणाले, युपीएचं सरकार असताना त्यावेळचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासमोर या प्रकल्पाचं प्रेझेंटेशन दिलं गेलं होतं. त्यावर चर्चाही झाली होती. पण दुर्दैवानं सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ पुढे जाऊ शकले नाहीत.

काँग्रसचे नेते अहमद पटेल यांनी ट्विट करून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच परवानगी दिली होती असा दावा केला होता. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा दावा खोडून काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये  या मोहिमेला परवानगी दिली होती असा खुलासा जेटली यांनी केला.