बीडमध्ये प्रितम मुंडेंच्या विरोधात जयदत्त अण्णा की भैयासाहेब ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यामध्ये आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असून अनेक उमेदवार निश्चित करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस कामाला लागले आहे. मात्र भाजप– शिवसेना युतीवर अद्याप कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. दरम्यान, केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला असून बीडच्या विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लोकसभा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

Loading...

आता प्रितम मुंडे यांच्याविरोधात नक्की कोण शड्डू ठोकणार याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अमरसिंह पंडित यांचं नाव निश्चित केले आहे. तर त्याचबरोबर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर हे देखील या जागेवरून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यात राज्यातील काही मतदारसंघांमधील संभाव्य उमेदवारांच्या नावांवर निश्चितीही केली. त्यामध्ये बीडमधून राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित असा सामाना रंगण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, बीडमध्ये मुंडे विरुद्ध पंडित अशीच लढत होईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...