पुण्यात उद्या मतदान,बापट विरुद्ध जोशी कोण मारणार बाजी ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यातील मतदानाला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे तिसऱ्या टप्यात मतदान होणाऱ्या उमेदवाराचे लक्ष आता मतदारांकडे लागले आहे. तिसऱ्या टप्यात बारामती , पुणे , सांगली , माढा , जालना , रावेर , रायगड इ. महत्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून पुणे जिल्ह्यातील दोन महत्वाच्या लढतींचा या टप्यात समावेश आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. कारण पुणे लोकसभा मतदार संघातून भाजप युतीकडून अनुभवी नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस आघाडीकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना उतरवण्यात आलं आहे.

Loading...

या निवडणुकीत भाजप पक्ष पुण्यामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन उतरला आहे. पुणे शहराच्या बदलत्या गरजा , शहरांमधील उपाययोजना , आधुनिक पुण्याचा आराखडा असे अनेक मुद्दे घेऊन गिरीश बापट या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तसेच बापट यांचा स्थानिक व राज्य पातळीवरचा प्रदीर्घ असणारा अनुभव आणि स्थानिक पातळीवर काम करताना लोकांशी जोडलेले संबंध याचा फायदा भाजप पक्षाला होणार आहे. शहराच्या विकासाच्या गतीला चालना देणे , महानगराला आवश्यक असणाऱ्या बहुउद्देशीय प्रकल्पांना प्राधान्य देणे , शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देणे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असा दावा गिरीश बापट आणि भाजप पक्षाकडून होत आहे.

पुण्याचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा , जास्तीत जास्त मेट्रोचे जाळे विणण्याचा प्रयत्न , वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशस्त आणि पर्यायी रस्ते या मुद्यांवर बापटांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मुलभूत गरजांचा विचार बापट यांच्याकडून होत असल्याने पुण्याचा मतदार हा भाजपकडे जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कॉंग्रेसने देखील मोहन जोशी यांच्या सारखा अनुभवी नेता गिरीश बापटांना टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरवला आहे. मोहन जोशी यांचा राजकीय अनुभव देखील दांडगा आहे. याआधी पुण्यातून १९९९ ला लोकसभा निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता. २००५ साली ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. तर २००८ साली ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. या आणि इतरही अनेक राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.

दरम्यान,सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हे आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत त्यामुळे त्यांनीही पुण्याकडे पाठ फिरवली आहे. पुण्यात एकही सभा न झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कॉंग्रेसचे स्टार प्रचारक असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील आणि आणखी काही छोट्या मोठ्या नेत्यांच्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद झाल्या. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.Loading…


Loading…

Loading...