कुणाल कुमार यांना केंद्राचे बोलावणे; कोण होणार नवे पुणे महापालिका आयुक्त ?

पुणे-  महापालिकेमध्ये तब्बल साडेतीन वर्ष आयुक्त म्हणून कारभार पाहणारे कुणाल कुमार यांना केंद्र सरकारकडून बोलावणं आले आहे. कुमार हे येत्या काही दिवसांत केंद्र सरकारच्या गृह निर्माण विभागात सहसचिव पदाची जबाबदारी स्वीकारतील

कुणाल कुमार हे मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या वादात सापडल्याच पहायला मिळाल. मग त्यामध्ये चोवीस तास समान पाणी योजना असो की केबल डक्टचा प्रस्ताव प्रत्येक वेळी ते मनमानी कारभार करत असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारीकडून करण्यात येत होता. अनेकवेळा त्यांच्यावर ‘बीजेपी कुमार’ म्हणून देखील टीका केली गेली. मात्र, कुमार यांनी वेळी रोष पत्करून ही समान पाणी पुरवठा योजना. केबल डक्ट. सायकल आराखड्या सारख्या योजना मार्गी लावल्या.

केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी योजना जाहीर करण्यात आल्यानंतर या स्पर्धेत पुणे शहराला क्रमांक दोन मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे पीएमओ कार्यालय देखील कुणाल कुमार यांच्यावर खुश होते. दरम्यान, आता नवे महापालिका आयुक्त कोण होणार याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगताना दिसत आहे.

You might also like
Comments
Loading...